कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : आज अखेर महायुतीच्या मंत्री मंडळाची स्थापना होणार आहे.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर सर्वांचे लक्ष लागून राहिले होते ते मंत्री मंडळाच्या स्थापनेकडे कुणाला कोणते मंत्रिपद मिळणार यांची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच विधासभेला केंद्रबिंदू बनलेल्या कोल्हापूर मतदार संघात महायुतीने विधानसभेला १० च्या १० जागा निवडून आणत मोठी बाजी मारली होती.. त्यामुळे कोणत्या आमदाराला कोणते मंत्रिपद मिळणार याकडे राज्याचे लक्ष लागून राहिले होते. अशातच आता महत्वाची बातमी समोर येत आहे..
कागल तालुका विधानसभा मतदारसंघातून सलग सहाव्यांदा आमदार म्हणून विजयी झालेले भाषण मिळाल्यावर हसन मुश्रीफ हे आज नव्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेत आहेत महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात 9 वेळा शपथ घेण्याचा एक नवा विक्रमी या निमित्ताने नोंदवणार आहेत जनसंपर्काचा एक वेगळा पॅटर्न म्हणून सर्वच राजकीय पक्षांमध्ये त्यांच्या कार्यशैलीची नेहमी चर्चा असते .भल्या पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत येणारे प्रत्येक कार्यकर्त्याला आणि प्रत्येक काम घेऊन येणाऱ्या मतदाराला थेट भेटणे आणि त्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करणे अथवा पत्र देऊन त्या कामाची निर्गत लावणे या हात यामुळे हे त्यांचे जनसंपर्काचे मोठे बलस्थान आहे कोरोना काळामध्ये जनजीवन ठप्प असतानाही कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पद भूषवत त्यांनी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने नियोजन करण या बँकेला एक नवी विधायक ओळख आपल्या कार्यशाळेची दिलेली होती विविध मंत्रिपदा तापवण्याचाही त्यांना अनुभव आहे सत्ता बदलाच्या अडीच वर्षापूर्वीच्या झालेल्या घडामोडी अजित पवारांच्या बरोबर पहिल्या टप्प्यात साथ देणारे हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद पुन्हा एकदा मिळत आहे
हसन मुश्रीफ यांचे कामकाज –
- . 20-11-1996 ते दि. 25-11-1999 अखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच; सन 1985 ते 2009 अखेर जिल्हा बँकेचे संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
- पहिल्यांदा ऑक्टोंबर 1999 मध्ये विधानसभेवर निवड मा. मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख मंत्रीमंडळात पधुसंवर्धन, दुग्धविकास खात्याचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
- जुलै 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन व दुग्ध विकास, औकाफ खात्याचे राज्यमंत्री,
- ऑक्टोंबर 2004 मध्ये विधानसभेवर फेर निवड मा.विलासराव देशमुख मंत्री मंडळात 9 नोव्हेंबर 2004 पासून शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, औकाफ व विधी व न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
- दि. 10 डिसेंबर 2008 पासून नगरविकास, जमीन कमाल धारणा, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्यांक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्यांचा कार्यभार संभाळला आहे.
- दि. 22 ऑक्टोंबर 2009 मध्ये विधानसभेवर तिस-यांदा विक्रमी 46,412 मतांनी निवड….. मा.अशोकराव चव्हाण व मा. पृथ्वीराज चव्हाण मंत्रीमंडळात नगरविकास, कमाल जमीन धारणा, पशुसंवर्धन, दुग्ध्यविकास, मत्स्यव्यवसाय, अल्पसंख्याक विकास (औकाफसह) विधी व न्याय या खात्याचा राज्यमंत्री तसेच; कामगार व जलसंपदा या खात्याचा कॅबिनेटमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आहे.
ऑक्टोंबर 2014 मध्ये विधानसभेवर चौथ्यांदा निवड
- दि. 21 मे 2015 पासून आजअखेर कोल्हापूर जिल्हा मध्यवती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत.
- दि. 21 ऑक्टोंबर 2019 मध्ये विधानसभेवर सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवड.
- दि. 30 डिसेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात ग्रामविकास खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी.
- 2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य या खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथविधी.
- दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतमोजणीत 11, 879 मतांनी विजयी होऊन सलग सहाव्यांदा आमदारपदी निवड.