कोल्हापूर ( प्रतिनिधी ) उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. सध्या कोल्हापुरात बिद्री कारखाना निवडणुक प्रचारा त ते पुढाकार घेत आहते. यावेळी पाटील यांनी कोल्हापुरात विविध ठिकाणी भेटी देऊन तेथील नागरिकांशी संपर्क साधला.

बिद्री कारखाना निवडणुक प्रचारादरम्यान पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील पंडेवाडी या गावास भेट दिली. या दुर्गम गावातही सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहायला मिळाला. बिद्री कारखाना निवडणुकीत योग्य उमेदवाराची निडवड करून परिवर्तन घडविणार असल्याची भावना यावेळी पंडेवाडीच्या सभासदांनी व्यक्त केली.

पाटील यांनी पुढे बिद्री कारखाना निवडणूक प्रचारादरम्यान कपिलेश्वर गावास देखील भेट दिली. यावेळी कपिलेश्वर गावातून परिवर्तन आघाडीला मताधिक्य देऊ अशी ग्वाही सर्व सभासदांनी दिली. येथील सभासदांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री झाली असल्याचे पाटील यांनी म्हटले.

बिद्री कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी पंचायत समितीचे माजी सभापती शामराव भावके यांच्या घरी सभासदांसोबत चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. याप्रसंगी सर्व सभासदांनी एकमुखाने परिवर्तन आघाडीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.