शाहुवाडी ( प्रतिनिधी ) : अमर रहे अमर रहे सुनिल गुजर अमर रहे. शित्तूर तर्फ मलकापूर तालुका शाहुवाडी येथील शहीद जवान सुनील गुजर यांच्यावर शित्तूर तर्फ मलकापूर या त्यांच्या मूळ गावी शासकीय इंतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. वडील विठ्ठल गुजर यांनी चितेला भडाग्नी दिला.
शाहूवाडी तालुक्यातील शित्तुर तर्फ मलकापूर येथील शहीद जवान सुनील गुजर हे भारत चीन सीमेवर कर्तव्य बजावत असताना 13 मार्च रोजी त्यांना वीरमरण आले .सुनील हे डोजरवर ऑपरेटर म्हणून काम करत होते. यावेळी रस्त्याचे काम सुरू असताना त्यांचा डोजर 500 फूट खोल दरीत कोसळला आणि या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. सोमवार दिनांक 17रोजी त्यांचा मृतदेह शित्तुर या गावी आणण्यात आला. गावातील स्मशानभूमीत त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार विनय कोरे, माजी आमदार सत्यजित पाटील, गोकुळचे संचालक करणसिंह गायकवाड, जि. प सदस्य विजय बोरगे, जि. प सदस्य सर्जेराव पाटील, जि. प सदस्य हंबीरराव पाटील, शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण, पंचायत समिती गट विकास अधिकारी मंगेश कुचेवार, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, तसेच शित्तूर, सोनवडे, बांबवडे, पिशवी या शाळेतील शालेय विद्यार्थी आणि शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.