मुंबई ( प्रतिनिधी ) : गुजराती सिनेमा मराठी सुपरस्टार स्वप्नील जोशी याच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यावर्षात स्वप्नील ने बॅक टू बॅक चित्रपट करून प्रेक्षकांचं नॉन स्टॉप मनोरंजन केले आहे. प्रेक्षकांना स्वप्नील येणाऱ्या वर्षात एका नव्या कोऱ्या गुजराती चित्रपटात दिसणार आहे.
स्वप्नील जोशी 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या एका अत्यंत अपेक्षित चित्रपटाद्वारे गुजराती चित्रपट इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. “शुभचिंतक” अस या चित्रपटाचं नाव आहे. अष्टपैलुत्वासाठी ओळखला जाणारा स्वप्नील आता गुजराती प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणार आहे. तो कायम अनपेक्षित आणि ग्राउंडब्रेकिंग दोन्ही भूमिका अगदी उत्तमपणे साकारतो यात शंका नाही. या चित्रपटात स्वप्नील सोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री मानसी पारेख देखील मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आले आहे.
स्वप्नील गुजराती चित्रपट विश्वात पदार्पण करतोय ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी नक्कीच अभिमानाची बाब आहे. वैविध्यपूर्ण भूमिकाच्या सोबतीने बहुभाषिक चित्रपट करण्याकडे नेहमीच स्वप्नीलचा कल असतो आणि आता तो त्याचा पहिला वहिला गुजराती चित्रपट करण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट कसा असेल आणि स्वप्नीलची भूमिका कशीअसेल हे पाहण्यासाठी मराठी चाहते आतुर झाले आहेत.