बीड : मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. शांतता रॅलीला बीड पोलिसांनी परवानगी नाकारली अशी चर्चा सुरू होती. मात्र शांतता रॅली निघणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर रॅली नंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार होती. मात्र सभा घेण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही. उलट पोलीस प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस प्रशासनाकडून मराठा समन्वयकांना करण्यात आलेली आहे.

मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी (11 जुलै) बीडमध्ये शांतता रॅली निघणार आहे. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात सभा होणार आहे. मात्र पोलीस प्रशासनाने या सभेला परवानगी नाकारली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज चौकात रस्त्याचे काम सुरू आहे. काम सुरू असल्याने ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या बाजूला असलेल्या छत्रपती संभाजी राजे क्रीडांगणावर सभा घेण्याची विनंती पोलीस करण्यात आली आहे. मात्र समाज बांधवांची गर्दी पाहता गैरसोय होऊ नये यासाठी सभेला पोलिसांची परवानगी नाही. परंतु यावर बैठक घेऊन पोलीस प्रशासन तोडगा काढणार आहे.

मराठा सामजाच्या वतीने गुरुवारी बीडमध्ये शांतता रलीचे आयोजन करण्यात आले आहे. फडणवीस साहेबाच्या सांगण्यावरून आणि अजित पवारच्या सांगण्यावरून बीडच्या पोलीस अधीक्षकांच्या सांगून तिथल्या पालकमंत्र्यांनी परवानगी रद्द केली, असे मनोज जरांगे यांनी लातूर येथील शांतता रॅलीत धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केले होते. त्या आरोपांनंतर धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

आठ तारखेलाच शांतता रॅलीला परवानगी दिली- धनंजय मुंडे
जरांगे यांच्या बीडमधील रॅलीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांनी विधिमंडळात अधिक माहिती दिली आहे. बीड जिल्ह्यात मराठा समाजाने शांतता रॅलीचे आयोजन केले आहे. पण प्रशासनाने या रॅलीला परवानगी नाकारली अशी अफवा पसरवण्यात आली आहे. पण सत्यस्थिती अशी आहे की 8 तारखेला या शांतता रॅलीला परवानगी दिली आहे. मी मराठा समाजाच्या आंदोलनात सहभागी झालो होतो. मी सुद्धा त्यांच्या लढ्यात सामील झालो होतो, असे स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिले. तसेच शांतता बिघडविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.