कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार मनीषा देसाई यांनी कार्यभार हाती घेतला. तर ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अरुण जाधव यांनी कार्यभार बुधवारी हाती घेतला आहे.
राज्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेमधील उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रविकांत अडसूळ यांची पालघर येथे तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) भालेराव यांची रत्नागिरी येथे बदली झाली आहे. कार्यभार हाती घेतलेले दोन्ही अधिकारी हे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.
मनीषा देसाई यांच्या नोकरीची सुरवात २००२ मध्ये परि. गटविकास अधिकारी म्हणून रत्नागिरी येथून झाली. त्यानंतर त्यांनी एकात्मिक बालविकास अधिकारी, बिडीओ, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, व्याख्याता ग्रामविकास प्रशिक्षण केंद्र अशा अनेक पदावर काम केले आहे.