मुंबई – गेल्या काही दिवसांपासून ‘येक नंबर’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली आहे. हा चित्रपट राज ठाकरे यांचा बायोपिक असल्याचे म्हटले जात होते. पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाची अनेकांना उत्सुकता लागलेली असतानाच ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा देखील दिसणार असल्याचे म्हटले जात होते. आता चित्रपटातील एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील मलायकाचा जलवा पाहण्यासारखा आहे. माझा एक नंबर असे या गाण्याचं नाव आहे. हे एक रॅम्पसॉन्ग आणि आयटम सॉन्ग दोन्हीचं मिक्स्चर आहे.

या रॅपसाँगमधून मलायका तिच्या अदाकारीने रसिकांना घायाळ केलेय. मलायका अरोरा या आयटम सॉन्गमध्ये आपली घायाळ अदा दाखवत आहे.आणि यात तिला साथ लाभली आहे महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधवची. हे आयटम साँग ऐकायला जितकं एनर्जेटिक आहे तितकंच ते पाहायलाही कमाल आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. या गाण्याबद्दल अजय गोगावले म्हणाला, “पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असलं तरी ते विनाकारण नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य म्हटलं की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु आम्हाला यात काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे याचाच आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणं करण्याचा एक नवीन प्रयत्न केला आहे.”

काय आहे गाणे?

प्रेक्षकांकडून ‘येक नंबर’ चित्रपटाची चर्चा सुरु असताना भन्नाट शीर्षकगीत रिलिज झाले आहे. एनर्जीने भरलेल्या या गाण्याला अजय-अतुल यांचे संगीत आणि शब्द लाभले असून या जबरदस्त गाण्याला जोनिता गांधीचा आवाज लाभला आहे. तर रॅप सौरभ अभ्यंकर यांचे आहे. गणेश आचार्य यांचे नृत्यदिग्दर्शन लाभलेल्या या गाण्याची खासियत म्हणजे अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे.