कोल्हापूर (प्रतिनिधी) : निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्याकरिता दारूचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने आदर्श आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी अवैध दारूची निर्मिती, वाहतूक, विक्री होणार नाही अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिल्या.
डॉ. सुर्यवंशी काय म्हणाले..?
डॉ. सुर्यवंशी म्हणाले, असा कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही. यासाठी सतर्क राहून नियमांर्तगत तरतूदी नुसार दारूबंदी गुन्ह्यांतर्गत गुन्हे नोंदविण्याकरिता आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहून प्रभावीपणे गुन्हा अन्वेषणाचे कामकाज करावे. विधानसभा निवडणूक 2024 च्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह अंमलबजावणी आणि दक्षता संचालक प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाचे विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर, कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहलता नरवणे, सातारा राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक रविंद्र आवळे, रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक किर्ती शेंडगे आदी उपस्थित होते.