पन्हाळा(प्रतिनिधी) : येथील संजीवन विद्यालय या निवासी प्रशालेत महात्मा गांधी-लाल बहादूर शास्त्री जयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी दोन्ही महामानवांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य महेश पाटील आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी गौरी पवार आणि पूर्वा चिक्कोडे या विद्यार्थिनींनी आपल्या भाषणातून महात्मा गांधी-लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा परिचय करून दिला.

प्रशालेतील समाजशास्त्र विभागाचे शिक्षक दीपक भिसे यांनी महात्मा फुले महात्मा गांधी-शास्त्रीजी यांच्या विचारातील वास्तवता पटवून दिली.तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्यांनी या महामानवांचे विचार विद्यार्थ्यांनी अंगीकारले पाहिजेत असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुगंध देवकुळे यांनी केले तर आभार नीता पाटील यांनी मानले.या कार्यक्रमास प्रशालेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.