कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाडा महाराष्ट्र आणि राष्ट्रीय कार्यकारणी सदस्यांची बैठक 8 डिसेंबर रोजी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर सभागृहांमध्ये संपन्न झाली. प्रयागराज येथे होऊ घातलेल्या महाकुंभ मेळ्यात हिंदू धर्मगुरू दशनाम गोसावी आखाड्याच्या वतीने गृहस्थ आणि इतर सर्व भाविक भक्तांचे शाहीस्नानासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता नवनियुक्त राष्ट्रिय कार्यकारणी मध्ये भविष्यात शाहिस्नान आणि इतर येणाऱ्या विविध विषयावर चर्चासत्र संपन्न झाले.

यामध्ये नवनियुक्त कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पातळीवर राष्ट्रीय अध्यक्ष आणि कार्यकारणीच्या सदस्यानी हिंदू धर्मगुरू आखाड्याचा विस्तार देश आणि राज्यभर करण्यासाठी तसेच समाजाच्या कल्याणासाठी आपल्या आखाडाकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे कार्य व्हावे आणि ते सतत वाढत रहावे अशी अपेक्षा संस्थापक अध्यक्ष, मठाधिपती, आंतरराष्ट्रीय योग सद्गुरु डॉ. कृष्णदेव गिरी महाराज यांनी व्यक्त केली आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भविष्यकाळासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रीय सचिव महंत शिवसुंदर गिरी महाराज, मध्य प्रदेश, राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गिरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष उर्मिला भारती, कोल्हापूर राज्य महिला अध्यक्षा मेघा भारती, अमरावती कार्यक्रमाचे संयोजक लक्ष्मण पुरी, महाराष्ट्र महामंत्री, ठाणे, गणेश पुरी नागपूर, विदर्भ महाराष्ट्र अध्यक्ष व्यंकटेश पुरी, रमेश पुरी, तसेच हिंदू धर्मगुरू दशनाम गोस्वामी आखाड्यातील देशभरातील सर्व राज्यातून पदाधिकारी उपस्थित होते.