कोल्हापूर (प्रतिनिधी) : ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघात अतिशय चांगले काम करून आपल्या कर्तृत्वाची मोहर उमटवली आहे. मतदारसंघाचा विकास आणखी गतीने होण्यासाठी ऋतुराज पाटील यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्य देऊन विजयी करुया असे आवाहन खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी केले. ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गोकुळ शिरगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते . यावेळी सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाहू महाराज पुढे म्हणाले, ऋतुराज पाटील यांचे काम मी पाच वर्षे जवळून पाहिले आहे. जनहिताच्या अनेक योजना त्यांनी मतदारसंघात यशस्वीपणे राबवल्या. मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना खासदार म्हणून आवश्यक ते सर्व सहकार्य करु.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल घाटगे म्हणाले, खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची संस्कृती असून विधायक काम करणा-यांना ऋतुराज पाटील यांना पाठबळ देऊया.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत म्हणाले, कणेरीवाडी पाणी योजना रद्द करण्याचे पत्र महाडिकांनी दिले होते. मात्र त्यावर ते काहीच बोलत नाहीत.
शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले, सुशिक्षित आणि सर्वांना सोबत घेऊन जाणा-या ऋतुराज पाटील यांना पुन्हा निवडून देऊया.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अवधूत साळुंखे म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी ही घोषणा महाडिकांनी फारच मनावर घेतली आहे. सगळी पदे आपल्याच घरात पाहिजे असा त्यांचा हट्ट आहे. मुलाला आमदार करण्यासाठी पाहुण्यालाही कट्यावर बसवणाऱ्यांपासून सावध रहा. आरपीआयच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रुपा वायदंडे, सरपंच चंद्रकांत डवरे आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र संघटक बबन शिंदे डॉ. विशाल पाटील प्रणोती भाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी अर्जुन इंगळे, के डी पाटील, उत्तम आंबवडे, निशीकांत पाटील, टी. के. पाटील, संभाजीराव पाटील, दयानंद शिंदे, डी. डी. पाटील, गणपती कागले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
