कोल्हापूर (प्रतिनिधी) : देशाच्या प्रधानमंत्री पदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत. तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान नरेंद्र मोदी यांनीच मिळवलेला असून समाजाच्या विकासासाठी हे सरकार निश्चितपणाने कटिबद्ध राहील. तसेच बुथरचना सक्षम करुन विधानसभा निवणूकीला सामोरे जाणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. ते आज (रविवार) बूथ रचना कार्य योजना अभियानाच्या बैठकीमध्ये बोलत होते.

यावेळी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीदिनानिमित्य त्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, समन्वयक राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमु सुबराव पाटील हे प्रमुख उपस्थित होती.

यावेळी खा. महाडिक म्हणाले की, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी भविष्यकाळात बूथ मजबूत केल्यास विधानसभा निवडणुकीला यश मिळवणे सोपे जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.

महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी, नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन आजचा ठराव मांडला. त्याला ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी अनुमोदन दिले.

यावेळी माजी मंत्री भरमु सुबराव पाटील, मेजर भिकाजी जाधव, के एन पाटील, हंबीरराव पाटील, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, संभाजी आरडे, विलास रणदिवे, अनिल तळकर, दत्तात्रय मेडशिंगे, मंदार परितकर, स्वप्निल शिंदे, अनिरुद्ध केसरकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, किरण नकाते आदी उपस्थित होते.