कोल्हापूर (प्रतिनिधी) : चॉकलेट म्हणजे सर्वाचा आवडता पदार्थ आहे. चॉकलेट हा पदार्थ खाल्याने वेगळाच आंनद मिळतो. जो आपल्या स्वादेंद्रियांना एक विचित्र पण चांगला अनुभव देतो. चॉकलेट केवळ गोड पदार्थ नसून अंधारात किरण देणारा आणि जीवनात एक वेगळाच आनंद देणारा पदार्थ आहे. चॉकलेटचा इतिहास मेसोअमेरिकेतील माया आणि अझ्टेक संस्कृतींपर्यंत मागे जातो. त्यावेळी कोकोच्या बियांपासून तयार केलेले पेय हे केवळ राजघराण्यासाठी राखीव असत होते. या कोको पेयाला ते पवित्र मानत आणि विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्याचा वापर करत असायचे.
चॉकलेटचा इतिहास….
स्पॅनिश लोकांनी माया आणि अझ्टेक संस्कृतींशी संपर्क केल्यानंतर,चॉकलेट पाश्चात्त्य जगात पोहोचले. स्पॅनिशांनी कोकोच्या बियांपासून तयार केलेल्या पेयाला साखर घालून अधिक चविष्ट केले आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण सुरुवातीला हा पदार्थ त्यांनी अनेक वर्षे गुप्त ठेवला आहे. 1579 मध्ये एका स्पॅनिश जहाजावर इंग्रजी समुद्री चाच्यांनी हल्ला केला होता आणि त्यांना कोको बियांनी भरलेले भांडे सापडले होते. या बियांचे महत्त्व त्यांना ठाऊक नसल्याने, ते भांडे मेंढ्यांच्या विष्ठेने भरले आहे असे समजून त्यांनी ते जाळून टाकले. यावरून समजते की, चॉकलेटच्या महत्त्वाची ओळख जगाला किती उशिरा झाली.
1829 मध्ये कोको प्रेसच्या शोधाने चॉकलेटच्या उत्पादनात मोठी क्रांती घडवून आणली होती. कोको प्रेसने कोको पावडर आणि कोको बटर वेगळे करण्याची प्रक्रिया सुलभ केली. 1847 मध्ये जगातील पहिला चॉकलेट बार तयार करण्यात आला. या ऐतिहासिक टप्प्यानंतर चॉकलेटच्या उत्पादनात सातत्याने नवीन प्रयोग झाले. इंग्लंडमधील कॅडबरी कंपनीने 1849 मध्ये चॉकलेटच्या बॉक्सची कल्पना साकारली ज्याने व्हॅलेंटाईन डेसाठी विशेष आकर्षण निर्माण केलेले आहे.
राष्ट्रीय चॉकलेट दिवस हा चॉकलेटच्या दीर्घ आणि समृद्ध इतिहासाला साजरा करण्याचा दिवस आहे.