मुंबई : राज्यात ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला गेल इंडिया या पेट्रोकेमिकल्स कंपनीचा प्रकल्प महाराष्ट्रातून भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात गेला आहे. यावरून विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला सवाल करत धारेवर धरले आहे.

वडेट्टीवार यांनी ट्विट करत सरकारला जाब विचारला आहे. ट्विट मध्ये विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, आधी महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवण्यात आले, आता मध्य प्रदेशमध्ये प्रकल्प पळवण्यात आला आहे. महाराष्ट्रावर भाजपाची आगपाखड का असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे.

महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करत आहे ?असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे.