मुंबई (प्रतिनिधी) : राज कपूर हे हिंदी चित्रपट अभिनेते आणि निर्माते – दिग्दर्शक होते. राज कपूर यांना 1978 साली दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पुणे जिल्ह्यातील राजबाग लोणी काळभोर येथील बंगल्यामध्ये राज कपूर यांचे स्मारक देखील बांधण्यात आले आहे. राज स्वतः अत्यंत साधे होते. महागड्या हॉटेल एवजी ते नेहमी चौकातल्या एखाद्या चहाच्या दुकानावर किंवा ढाब्यावर जायचे. त्यामुळे खरीखुरी मंडळी त्यांना भेटायची. त्यांची सुख-दुःखे त्यांना समजायची. त्यांच्या चित्रपटाचा हा प्रेरणास्रोत होता. तर आज दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा 14 डिसेंबर रोजी 100 वा वाढदिवस आहे.

अभिनेत्याची 100 वी जयंती कपूर कुटुंबीय मोठ्या थाटातमाटात साजरी करत आहेत. तर त्यांच्या आयुष्यातील अनेक कथा प्रसिद्ध झालेल्या आहेत. आज त्यांची 100 वी जयंती साजरी केली जात आहे. राज कपूर यांचे नाव तीन बॉलिवूड अभिनेत्रींसोबत जोडले गेले होते. पण एक अभिनेत्री अशी होती जिच्या प्रेमात राज कपूर वेडे झाले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील शोमॅन म्हटल्या जाणाऱ्या राज कपूर त्यांच्या वैयक्तिक नात्यांमुळे खूप चर्चेत होते. त्यावेळी राज कपूर यांचे नाव ज्येष्ठ हिंदी सिने अभिनेत्री नर्गिसशी जोडले गेले होते. दोघांनी जवळपास 16 चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. आवारा, श्री 420, अनारी, चोरी-चोरी असे अनेक चित्रपट आहेत ज्यात राज कपूर आणि नर्गिसची जोडी एकत्र दिसली होती.