कोल्हापूर (प्रतिनिधी ) – सर्वत्र श्री गणरायांचे आगमन मोठ्या जल्लोषात होत आहे. गणेश चतुर्थी निमित्त सर्वत्र आनंदाने उत्साहाचे वातावरण असून महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब यांच्या घरी देखील अशा उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या माजी कोषाध्यक्ष सौ.वैशाली क्षीरसागर, युवा सेना पश्चिम महाराष्ट्र सचिव ऋतुराज क्षीरसागर, युवा नेते पुष्कराज क्षीरसागर, सौ. दिशा क्षीरसागर यांनी भक्ती भावाने गणरायाची प्रतिष्ठापना आणि पूजा तसेच आरती केली.
तसेच यावेळी राज्यातील जनतेला सुख समाधान आरोग्य लाभू देत आणि जनतेची सेवा करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारला संधी मिळू देत, आणि सर्वत्र समृद्धी नांदू देत अशी प्रार्थना क्षीरसागर परिवाराने केली.