कोल्हापूर ( वृत्तसंस्था ) कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर गाड्यांवरील चालकांनी किमान वेतनच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरु होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही प्रश्नावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे किमान वेतनसाठी उद्यापासून टिप्पर चालकांनी उपोषणाचे हत्यार उपसणार आहेत.

गेले सहा महिने झाले टेंडर प्रक्रिया सुरु होती. प्रक्रिया पूर्ण होऊन महिना होऊन देखील वर्क ऑर्डर काढलेली नाही. वर्क ऑर्डर त्वरित काढावी, किंवा प्रिंसिपल एम्प्लॉयर या नात्याने फरकाची रक्कम द्यावी अशी मागणी आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्याकडे केली होती. परंतु यावर कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आज टिप्पर चालकांनी बंद पुकारला. परिणामी शहरातील कचरा उठाव ठप्प होणार आहे.

संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असताना काही माजी नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून जर महापालिका अधिकारी निर्णय घेत नसतील तर आम्हाला बंद पुकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. आम्ही महापालिकेला दोन पर्याय दिले आहेत. यापैकी एक निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टिप्पर चालक काम बंद करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस ( पवार गट ), बहुजन परिवर्तन पार्टी, राष्ट्रीय ब्लॅक पँथर यांनी आंदोलनास पाठिंबा दिला.यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण गळतगे, उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, किरण साळोखे, कुमाजी पाटील, संजय नलवडे, उमेश वडर, अमरसिंह दळवी, राकेश गायकवाड, मनोहर नाटकर, नाझील शेख आदी उपस्थित होते.