कोल्हापूर (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात पोलिस भरतीसाठी खास तयारी करणाऱ्या युवक आणि त्यांच्या पालकांकडून पोलीस भरतीबाबत वारंवार विचारणा होत होती. मात्र, यावर प्रशासनाने निर्णय घेतला नसल्याने ठोस उत्तरही मिळत नव्हते. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलिस प्रमुखांनी पोलिस भरतीबाबतचे नियोजन स्पष्ट केले आहे.

कोल्हापूर पोलिस दलातील शिपाई पदाच्या 154 आणि पोलीस चालक पदाच्या 59 जागांसाठी 19 ते 27 जून दरम्यान भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोल्हापूर पोलिस मुख्यालयाजवळ पोलिस परेड ग्राउंडवर ही भारतीय प्रक्रिया होणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या पोलीस अधिक्षकांनी दिली. शिपाई पदाच्या 154 जागांसाठी 6 हजार 677, तर शिपाई पदाच्या 59 जागांसाठी 4 हजार 668 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.

शारीरिक चाचणीसाठी तंत्रज्ञानाचा वापर..!

नुकत्याच जाहीर केलेल्या नियोजनानुसार, उमेदवारांच्या शारीरिक चाचणीसाठी आरएफआयडी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना देखील प्रमाणपत्र देऊन चार दिवसांची मुदत दिली जाणार असल्याचे महेंद्र पंडित यांनी म्हटलं आहे.

पोलीस भरती दरम्यान उमेदवारांच्या शारीरिक चाचणी वेळी पावसाचा अडथळा आल्यास ही शारीरिक चाचणी कसबा बावडा ते शिये या मार्गावर घेण्याची पर्यायी व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती सुद्धा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

महाराष्ट्र पोलिस दलाची भरती ही मेरिटवर व पारदर्शक होते. दरवर्षी आमची गोपनिय यंत्रणा आहे त्यांना आम्ही सक्रिय करत असतो. कुठलाही एजंट आपल्याला आश्वासन देत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्या अमिषाला बळी पडू नका. तसे निदर्शनास आले, तर आमच्याशी संपर्क करा, असेही आवाहन करण्यात आलं आहे.

लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार…

दरम्यान, महाराष्ट्र पोलिस दलात विविध 17 हजार पदे रिक्त आहेत. यासाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. कारागृह भरतीमध्ये 1 हजार 800 पदासाठी 3 लाख 72 हजारांहून अधिक अर्ज आलं आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया 19 जूनपासून भरती प्रक्रिया होणार आहे. लेखी परीक्षा, मैदानी परीक्षा प्रत्येक जिल्ह्यात होणार आहेत.