कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांच रणांगण सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आता राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करत आहेत.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 120 हून अधिक शासन निर्णय जारी केले असून यामध्ये लाडकी बहिण योजनेची चर्चा सर्वात जास्त आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील लाडक्या बहिणी लाडक्या भावाला मतदान करतील असा विश्वास महायुतीमध्ये नेत्यांमध्ये आहे.

अशातच, महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आपली असल्याचे सांगितले. अजित पवार गटाकडूनही लाडक्या बहिणी योजनेचा प्रचार करण्यात आला. त्याचबरोबर भाजपकडून सुद्धा लाडक्या बहिणीचा प्रचार करण्यात आला. त्यामुळे योजना एक जरी असली तरी तीन पक्ष या योजनेचे श्रेय घेत असले तर दिसून येत आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीला राज्यातील लाडक्या बहिणी कोणत्या पक्षाच्या पारड्यात आपलं मत टाकणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, कागल, कोल्हापूर उत्तर आणि शिरोळ या 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या मतदारसंघांमध्ये महिला कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल आहे.