कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (सोमवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात २१ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात एकही मृत्यू झालेला नाही. दरम्यान दिवसभरात ३३ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११२३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९ , भूदरगड तालुक्यातील १ , गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील , करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण जणांना २१ कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ३३जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४९,२२१.

एकूण डिस्चार्ज : ४७,३०९.

उपचारासाठी दाखल रुग्ण : २२२.

एकूण मृत्यू :१६९०.