मुंबई (प्रतिनिधी) : सध्या हिवाळा ऋतू सुरू असून पेरूचा देखील हंगाम सुरू आहे. पेरू सध्या मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत. पेरू आपल्या शरीरासाठी खूप आरोग्यदायी असून पेरूच्या पानांचाही उल्लेख आर्युवेदात असेलला आढळतो. चला तर जाणून घेऊयात पेरूच्या पाने सेवन करण्याचे फायदे. नियमितपणे पेरूच्या पानांचे सेवन केल्याने आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात.

पेरूच्या पानांचे फायदे पुढीलप्रमाणे –

  • पेरूच्या पानांमध्ये असे घटक असतात जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही पाने खूप फायदेशीर ठरू शकतात.
  • पेरूच्या पानांमध्ये भरपूर फायबर असते. हे फायबर पचनक्रिया सुधारते, बद्धकोष्ठता दूर करते आणि पोटाच्या इतर समस्यांवरही उपाय करू शकते.
  • पेरूच्या पानांचे काढे करून गरगरा केल्याने दात आणि घसा निरोगी राहतो. दातदुखी, घसा खवखवणे या समस्यांवरही ते उपयुक्त ठरते.
  • पेरूच्या पानांमध्ये असलेले विविध पोषक तत्वे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • पेरूच्या पानांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात.
  • पेरूच्या पानांमध्ये कमी कॅलरीज असतात आणि ते पोट भरून ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही पाने उपयुक्त ठरू शकतात.

अशाप्रकारे आहेत पेरूची पाने खाण्याचे फायदे.