देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील किंजवडे येथील खालची बाईतवाडी, कदमवाडी येथील अन्नपूर्णा नदीवरील साकव हा पूर्णतः जीर्ण झाला आहे. याठिकाणी साकवा ऐवजी नव्याने मायनर ब्रिज व्हावा. अशी मागणी किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तर या निवेदनाची दखल घेत पालकमंत्र्यांनी, संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतचा प्रस्ताव तात्काळ पाठवण्यात यावा, असे सांगितले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, किंजवडे सरपंच संतोष किंजवडेकर, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.