मुंबई – बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याला काल उन्हामुळे डिहायड्रेशन झाल्याने अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अहमदाबादच्या उन्हाचा फटका शाहरुख खान याला बसला. शाहरुख खान याच्यावर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी शाहरुख खान याच्यासोबत त्याची पत्नी गाैरी खान ही उपस्थित आहे. शाहरुख खान याला त्रास होत असल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्येही चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं.

मिळालेल्या माहिती नुसार , सध्या आयपीएल हंगामात व्यस्त असलेला शाहरुख खानला रुग्णालयात दाखल करण्या आलं. कडाक्याच्या उन्हामुळे त्याला त्रास होत असल्याने प्रकृती अस्वास्थतेमुळे शाहरुखला अहमदाबादमधील केडी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आता त्याची प्रकृती स्थिर असून त्याला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

या बातमीमुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्येही आनंदाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळतंय. त्याला रुग्णायलात दाखल केल्यानंतर सोशल मीडियावरुन त्याचे चाहते त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. पण आता शाहरुखची प्रकृती स्थिर असून आता शाहरुख त्याच्या संघाची फायनल पाहण्यासाठी मैदानात येणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.