सावरवाडी (प्रतिनिधी) : सहकारी साखर कारखानदारीतील एक स्वच्छ प्रतिमा असलेले आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष  आ. पी. एन. पाटील यांनी भोगावती साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसचे करवीर तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील (वडणगे पाडळी) यांनी केली. आज संध्याकाळी त्यांनी ‘लाईव्ह मराठी’ प्रतिनिधीशी यावर संवाद साधला.

पाटील म्हणाले की, आ. पी. एन. पाटील यांनी भोगावती कारखाना सुस्थितीत चालवला आहे. ऊस बिले, कामगारांचे पगार वेळेत दिले आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे आमच्यासह कार्यकर्ते, संचालक, ऊस उत्पादक नाराज झाले आहेत. वास्तविक कारखान्याच्या प्रगतीसाठी त्यांच्या अनमोल मार्गदर्शनाची आणि नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या भावनांचा विचार करून त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी जाहीर विनंती करीत आहोत.