कोल्हापूर (प्रतिनिधी) : इंडिया आघाडी,महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ कॅाग्रेस नेते सतेज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कराड येथील विठ्ठल चौकात जाहीर सभा पार पडली. ॲड.उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचीही यावेळी उपस्थिती होती. कराड दक्षिण विधानसभेचे इंडिया आघाडी,महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारार्थ आगाशिवनगर,मलकापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित कॅाग्रेस नेते सतेज पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी कॅाग्रेस नेते सतेज पाटील बोलताना म्हणाले की,कराड दक्षिणमधल्या मतदारांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास कायम असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचा संकल्प मतदारांनी केला आहे.पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी कराड दक्षिण मधून मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून देण्याचं आवाहन मतदारांना केले आहे.नागरिकांचा उत्फुर्त प्रतिसाद त्यांच्या विजयाची साक्ष देत होता.
यावेळी कराडचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे,अजितराव पाटील-चिखलीकर,शिवसेनेचे नितीन काशीद यांच्यासह शंकरराव खबाले,नामदेवराव पाटील,धनाजी काटकर,कराडच्या माजी नगराध्यक्षा निलम येडगे,विद्या थोरवडे,गीतांजली थोरात,नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक,आपचे धीरज जाधव,शिवसेनेचे शशिराज करपे यांच्यासह निवास थोरात,धीरज चव्हाण,शिवराज मोरे, दिग्वीजय पाटील,प्रकाश जाधव,शहाजी डुबल यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने होते.