मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती भाजपच्या वतीने अभिनेत्री हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत विजय मिळवल्यानंतर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी सीआईएसएफ महिला कांस्टेबल कुलविंदर कौरने कंगनाला चंदिगढ विमानतळावर कानाखाली लावली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली होती. पण एकेकाळ असा होता ज्यात कंगना तिच्या खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत होती. कंगना रनौतचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं पण ते नातं कधी लग्नापर्यंत नाही जाऊ शकले. पण बॉलिवूडच्या एका अभिनेत्याने कंगना रनौत सोबत पती – पत्नी सारखे राहीलो असल्याचा दावा केला होता.

कोण आहे हा अभिनेता..?

हा अभिनेता दुसरा तिसरा कुणी नसून, अभिनेता आदित्य पंचोली होता. आदित्य आणि कंगना यांनी एकमेकांना अनेक वर्ष डेट केलं. दोघांमध्ये तब्बल 21 वर्षाचं अंतर होतं. तेव्हा कंगना यांनी बॉलिवूडमध्ये करियरला सुरुवात केली होती. तेव्हा कंगना – आदित्य यांच्या नात्याच्या चर्चांनी सर्वत्र जोर धरला होता. पण ब्रेकअपनंतर आदित्य पंचोली याने अभिनेत्रीवर अनेक गंभीर आरोप लावले.

कंगना यांच्याबद्दल आदित्य म्हणाला होता, ‘कंगना हिच्यासोबत जेव्हा ओळख झाली तेव्हा अभिनेत्रीकडे एक रुपया देखील नव्हता. 2004 मध्ये माझी आणि कंगनाची ओळख झाली होती. एका मित्राने अभिनेत्रीची मदत करण्यासाठी सांगितलं होतं. जवळपास तीन वर्ष आम्ही एका घरात पती – पत्नी सारखं राहात होतो

कंगना रनौत यांना एक मुलगा सतत त्रास देत होता. पण त्याच मुलासोबत कंगना तब्बल अधिक काळ फोनवर बोलायची. कंगना एक महिना त्या मुलासोबत बोलत होती, ज्यावर तिने त्रास देण्याचे आरोप लावले होते. असं देखील आदित्य पंचोली म्हणाला होता.

यानंतर कंगणा रनौत हिने ‘माझ्या वडिलांच्या वयाच्या पुरुषाने माझ्या डोक्यावर जोरात मारलं होतं…’ असे म्हणत आदित्य पंचोलीवर अनेक गंभीर आरोप केले होते.