कळे, ता. २१: आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 12 वीचा निकाल जाहीर झाला. कळे (ता.पन्हाळा ) येथील कळे विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचा इ.१२ वीचा एकुण निकाल ९३.७९टक्के लागला. कला शाखेचा ९०.२४ टक्के निकाल तर वाणिज्य शाखेचा १०० टक्के निकाल लागला.

यामध्ये कला शाखा – सोनल मनोहर पाटील हिने ८६.८३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. अरुणा बाबासो पोवार हिने ८४.०० टक्के गुण मिळवून द्वितीय तर मधुरा शरद पोतदार हिने ८३.६७ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.वाणिज्य शाखा – सोनम विश्वास घाग हिने ८२.५० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला . नंदिनी भिकाजी पाटील हिने ८०.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर विशाखा मारुती डवंग हिने ७६.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.

सर्व विद्यार्थ्यांना पन्हाळा एज्युकेशन सोसायटीचे संस्था अध्यक्ष अ.भा जरंडीकर , उपाध्यक्ष डॉ. बी. आर कोरे , गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष ऍड. गिरीश ग.नानिवडेकर, उपाध्यक्ष माधव प्र.गुळवणी, सचिव पी.ए.यज्ञोपवित यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्रशालेचे प्राचार्य ए. बी. गायकवाड , प्रा.बी. बी. कांबळे , प्रा. के. टी. खोत, प्रा.कु. व्ही. डी. कोळी, प्रा. एस.वाय.कदम , प्रा. एस .बी.सावंत , प्रा. एस.एस.खांबे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.