पुणे : अकराव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेमध्ये खोलवर चढायांच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्स संघाने गुजरात जाएंट्स संघाचा 42-29 असा पराभव करून या स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखुन ठेवले आहे. सुरूवातीला जयपूर संघाने 27-16 अशी आघाडी मिळविली होती. जयपूर संघालादेखील फारशी चमकदार कामगिरी करता आली. पण त्यांनी आतापर्यंत झालेल्या 17 सामन्यांपैकी आठ सामन्यांमध्ये विजय मिळविलेला आहे. जयपूर संघाला याआधी पाटणा पायरेट्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळेच या दोन्ही कमकुवत संघांमध्ये आज कोण बाजी मारणार याची उत्सुकता होती.

तर श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत गुजरात आणि जयपूर या दोन्ही संघांची आजपर्यंतची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. गुजरात संघाने आतापर्यंत झालेल्या 17 सामन्यांपैकी फक्त पाच सामने जिंकले आहेत. गुजरात संघाच्या खेळाडूंनी ही पिछाडी भरून काढण्यासाठी जोरदार प्रयत्न केले आहेत.‌ पण त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला जयपूर संघाकडे 17-8 अशी आघाडी होती. पंधराव्या मिनिटाला त्यांनी दहा गुणांची आघाडी मिळाली होती.त्यावेळी त्यांच्याकडे 26-14 अशी आघाडी होती.

जयपूरच्या बलाढ्य आक्रमणास गुजरातचे खेळाडू कसे सामोरे जाणार हीच उत्सुकता लागुन राहिली होती. सामन्याच्या तिसाव्या मिनिटाला जयपूर संघ 34-21 अशा गुणांनी आघाडीवर होता. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना जयपूर संघाने 38-26 अशी आघाडी टिकवत विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरूवात केली. जयपूर संघाच्या विजयात अर्जुन देशवाल, नीरज नरवाल यांनी केलेल्या खोलवर चढायांचा मोठा वाटा होता.