घर असो किंवा मंदिर, लोक प्रसादासोबत देवाला नारळ नक्कीच देतात, पण अनेकदा अर्पण केलेला नारळ फोडताना खराब होतो. अशा वेळी अनेकजण नारळ फेकून देतात किंवा देव कोपला आहे आणि काहीतरी अशुभ घडले आहे किंवा होणार आहे अशी भीती वाटते. तुम्हीही असा विचार करत असाल तर ही गोष्ट तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाका. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पूजेमध्ये दिलेला नारळ खराब निघाला तर तो अशुभ मानला जात नाही तर तुमच्यासाठी शुभ आहे. जाणून घ्या यामागे काय कारण आहे.

तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार

नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. यामुळेच पूजेमध्ये नारळ असणे आवश्यक आहे. नारळ फोडताना तो खराब होऊन बाहेर आला तर त्याचा अर्थ देवाने प्रसाद स्वीकारला असा समज आहे. यामुळेच नारळ आतून सुकून गेला आहे. नारळ खराब होणे हे अशुभ नसून शुभ मानले जाते. असे झाल्यास, हे सूचित करते की तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही

सर्वांना वाटा प्रसाद…

प्रसादाच्या रुपात देवाला दाखवलेला नारळ जर स्वच्छ आणि चांगला निघाला तर तो प्रसाद म्हणून स्रवांना वाटावा. देवाचा प्रसाद जितक्या लोकांना वाटाल तितकं पुण्य तुम्हाला मिळतं असं म्हणतात. पण, एक गोष्ट लक्षात घ्या, की कधीही प्रसादाला खरकट्या हातांनी हात लावू नये तसेच खाऊ नये. यामुळे देव-दैवत नाराज होतात. तसेच, जर पूजेचा प्रसाद शिल्लक राहिला असेल तर तो स्वच्छ भांड्यात ठेवा. जर, चुकून प्रसाद जमिनीवर पडला तर तो पक्ष्यांना खाऊ घाला.