मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएल 2025 सध्या प्ले-ऑफच्या शर्यतीच्या जवळ आले आहे. भारत-पाकच्या तणावामुळे आयपीएलचा कालचा सामना पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळवला गेला पण तो सामना अर्धवटच थांबवण्यात आला. आयपीएल लांबणीवर गेली पण किती वेळ आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयचे मानद सचिव देवजित सैकिया यांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने चालू असलेल्या आयपीएल 2025 च्या उर्वरित स्पर्धा तात्काळ एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकारी आणि भागधारकांशी सल्लामसलत करून परिस्थितीचा व्यापक आढावा घेतल्यानंतर स्पर्धेचे नवीन वेळापत्रक आणि ठिकाणांबाबत पुढील अपडेट्स योग्य वेळी जाहीर केले जातील.

बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंच्या चिंता आणि भावना व्यक्त केल्या आणि प्रसारक, प्रायोजक आणि चाहत्यांचे मत जाणून घेतल्यानंतर सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.