नवी दिल्ली(प्रतिनिधी) : नोकरीमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर उत्तम पेन्शन मिळवायची असल्यास तुम्हांला योग्य पद्धतीने गुंतवणूक करणे गरजेचे असते तसेच ,आपल्या उतरत्या वयात निवांत आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी प्रत्येकाने निवृत्तीचे नियोजन करायला हवे . सेवानिवृत्तीनंतर 2 लाखांची पेन्शन हवी असल्यास आताच्या क्षणापासून किती बचत करावी आणि गुंतवणूक करावी लागेल याचा आढावा घेऊयात .

सेवानिवृत्तीचे नियोजन कसे असते..


सध्याच्या मुदत ठेवींवर 7ते 8 टक्के व्याजदर मिळतो प्रत्येक सेवानिवृत्तीवर 5 ते 6 टक्के व्याज मिळेल किंवा जास्त व्याज तुम्हाला फायदेही जास्त मिळतील असे गृहीत धरू. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला दरमहा दोन लाखांची गरज असेल तर तुम्हाला वार्षिक 24 लाख व्याज लागेल. अशाप्रकारे तुम्हाला 24 लाख रुपये 5% व्याजाने हवे असतील तर त्यासाठी तुमच्याकडे सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी असला पाहिजे. यासह तुम्हाला वार्षिक 5% दराने सुमारे 25 लाख रुपये व्याज मिळेल.