कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या नगरसचिव विभागातील ३१ कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत प्रशासकीय कामाकाजाचे सोईस्तव अन्य विभागात बदल्या करण्यात आल्या आहेत. असा आदेश प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिला आहे.

महानगरपालिकेच्या सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपली आहे. त्यामुळे नगरसचिव कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत असलेले कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय कामकाजाचे सोईस्तव अन्य विभागाकडे बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांनी बदली झालेल्या ठिकाणी रुजू व्हावे. यासाठी पुन्हा कार्यमुक्त आदेशाची आवश्यकता नाही. तसेच त्यामध्ये बदल करण्यासाठी  राजकीय दडपण आणू नये तसे केल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई होवू शकते. याची संबंधित कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासक डॉ. बलकवडे यांनी केले आहे.

तर संबंधित खातेप्रमुखांनी त्याच्यांकडे समायोजित केलेले कर्मचारी हजर झाले आहेत का. याचा अहवाल तीन दिवसात आस्थापना अधिक्षकांनी या कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तकात समायोजनाची नोंद घेवून अनुपालन अहवाल सहाय्यक आयुक्त क्रं.१ यांचेकडे सादर करण्याच्या सुचना ही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या आहेत.