पन्हाळा ( प्रतिनिधी ) : बदलापूर आणि पुण्याच्या राजगुरूनगर येथे अल्पवयीमुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्या. या घटनेची दखल घेत शासनाने सर्व शाळांमध्ये सुरक्षा म्हणून सीसीटिव्ही बसवण्याचे आदेश दिले आहेत. पन्हाळा भाजपा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले यांच्या नेतृत्वाखालील पन्हाळ्यातील जागरूक नागरिकांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांना निवेदनाद्वारे पन्हाळा येथील अंगणवाडी मध्ये बेबी टॉयलेट, पाण्याची सुविधा तसेच सीसीटिव्ही कॅमेरे बसवण्याचे मागणी केली आहे.
यावेळी सुभाष गवळी, मनोज नाखरे, शुभम आडके, प्रमोद उदाळे आणि सत्यजित गायकवाड उपस्थित होते.