मुंबई – भारतीय महिला संघाची सध्या न्यूझीलंडविरुध्द एकदिवसीय मालिका सुरू आहे. भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये आतापर्यत दोन एकदिवसीय सामने झाले आहेत. ज्यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात विजय मिळवला होता तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवून मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी केली आहे. आज या मालिकेचा शेवटचा सामना रंगणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड महिलांचा आजचा हा तिसरा सामना काही वेळात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. न्यूझीलंडमहिला संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. आजचा मालिकेचा शेवटचा सामना असणार आहे त्यामुळे आजच्या सामन्यात ज्या संघाचा विजय होईल तो संघ मालिका नावावर करेल.