मुंबई (प्रतिनिधी ) : काल श्रीलंकेचा पराभव करत दक्षिण आफ्रिकाने डब्लूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावरून पहिल्या स्थानावर गेला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आता जवळ आला आहे. तिसरा सामना 14 डिसेंबरपासून गाबाच्या ऐतिहासिक मैदानावर खेळवला जाणार आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पोहोचली तेव्हा या दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 7.50 वाजता सुरू झाला. पहिल्या दिवशी नाणेफेक अर्धा तास आधी झाली. यानंतर दुसरी कसोटी दिवस-डेची होती आणि ती पिंक बॉलने खेळली गेली. त्यामुळे हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू झाला. इथेही नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजे नऊ वाजता झाली. कारण आता बदललेल्या वेळेत सामना होणार असून पहाटेच सामना सुरू होणार आहे.
तिसरा सामना गब्बा येथे पहाटे 5.50 वाजता सुरू होईल. इथेही नाणेफेक अर्धा तास आधी होईल. चौथ्या आणि पाचव्या कसोटी सामन्यांमध्ये नाणेफेक सकाळी 4.30 वाजता होणार असल्याच सांगण्यात येत आहे.