मुंबई : सोने आणि चांदी खरेदी करणे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे.मग तुम्ही याकडे गुंतवणूक म्हणून बघा किंवा दागिने म्हणून.सोने आणि चांदी खरेदी करणे दीर्घ मुदतीसाठी हा चांगला गुंतवणूक पर्याय आहे.सोन्या-चांदीचे भाव सतत बदलत असतात.म्हणून जेव्हा किंमती कमी असतात तेव्हा खरेदी करण्याचा सर्वोत्तम वेळ असतो.सध्या सराफ बाजारामध्ये शनिवारी सोने आणि चांदीच्या दरात वाढ होऊन इतिहास रचला गेला आहे.तर सोन्यात एकाच दिवसात चारशे रुपयांची वाढ झाली आहे.सोने ‘जीएसटी’सह दहा ग्रॅम 80 हजार 340 रुपयांवर गेले आहे.चांदीच्या दरात चार हजारांची वाढ झाली असून ती ‘जीएसटी’सह एक लाख 940 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.
सणासुदीच्या मुहूर्तावर सोने खरेदी केले जाते.तर सोन्याचा भाव तेव्हा 75 हजार 800 रुपये प्रति दहा ग्रॅम विना जीएसटी ईतका होता.तर सोन्याचे दर शुक्रवारी 77
हजार 600 दहा ग्रॅम विना जीएसटी दर होता तर चांदी 92 हजारांवर गेली होती.तर आता सोन्याच्या दरात दोन हजारांची वाढ होऊन चांदी 94 हजार प्रतिकिलोवर पोहोचली होती.आज त्यात चार हजारांची वाढ झालेली आहे.जीएसटी सह सोने शनिवारी 80 हजार 340 दहा ग्रॅम,तर चांदी एक लाख 940 रुपये प्रतिकिलोवर पोहोचली आहे.महिनाभर सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. दिवाळीपर्यंत सोने-चांदी नव्वद हजारांवर जाण्याची शक्यता असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे.