कोल्हापूर ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. राजकीय पक्षांनी देखील अंतर्गत हालचाली सुरु केल्या आहेत. नुकतीच भारतीय जनता पक्षाने राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापूर खासदार धनंजय महाडिक यांची वर्णी उत्तर मध्य-मुंबई लोकसभा मतदार संघासाठी निरीक्षक म्हणून झाली आहे.

दरम्यान राज्यातील 23 लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक निवडीची यादी जाहीर केली असली तरी या यादीमध्ये कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा या निवडणूक निरीक्षकांचा यामध्ये समावेश नाही. त्यामुळे कोल्हापूरच्या दोन्ही खासदारांना तुर्तास तरी दिलासा मिळाला आहे.

तसेच कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघ निरिक्षक पदी कोण असणार यावर पुढील यादीमध्ये शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात खुलासा होणार आहे हे निश्चित. दरम्यान माढा लोकसभासाठी भागवत कराड, प्रसाद लाड तसेच सांगलीसाठी मेधा कुलकर्णी, हर्षवर्धन पाटील यांची वर्णी लागली आहे.