कोल्हापूर( प्रतिनिधी ) – आजच्या माहिती विस्फोटच्या विभागामध्ये समाजाला योग्य असणारी बातमी निवडण्याचे पत्रकार समोर मोठे आव्हान आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ओबेराय यांनी व्यक्त केले .कोल्हापुरातील जायन्टस ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधत कोल्हापुरातील विविध प्रसार माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

शिवाजी उद्यम नगर येथील जायन्टस ग्रुपच्या सभागृहात पत्रकारांना गौरविण्यात आले. यावेळी जायन्टस ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या नुतन अध्यक्षा शुभदा कामत, डॉ. राजकुमार पोळ, बबिता जाधव,जायन्टस ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या उपाध्यक्षा आणि दैनिक क्रांतिसिंहच्या संपादिका सुनंदा मोरे, ऍड.अनिता काळे, सुरेश खांडेकर,छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे उस्ताद खान, रामचंद्र मेटेकरी व अन्य मान्यवर उपस्थित होते .

कार्यक्रमात पत्रकार लाईव्ह मराठी -दै . सोलापूर तरुण भारत चे राजेंद्र मकोटे , दैनिक क्रांतिसिंहच्या शुभांगी तावरे , दैनिक सकाळचे प्रकाश पाटील, दैनिक वार्ता शक्तीच्या श्रद्धा जोगळेकर , दैनिक केसरीच्या अश्विनी टेंबे , दैनिक क्रांतिसिंहचे अक्षय थोरवत आणि दैनिक सनातन प्रभातचे अजय केळकर, तरुण भारत चे विध्याधर पिंपळे आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय पातळीवर कोल्हापुरातील एखाद्या पत्रकाराने आपला नावलौकिक कमावावा , अशी अपेक्षा यावेळी रविंद्र ओबेरॉय यांनी व्यक्त केली.

ग्रुपच्या नूतन उपाध्यक्षा पत्रकार सुनंदा मोरे- बबिता जाधव यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. पत्रकार हा समाजातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून एखाद्या बातमीत नाव चुकल्यास दहा वेळा फोन करणाऱ्या कुणीही कोरोना संकटाच्या काळात आमची चौकशी केली नसल्याची खंत महिला पत्रकार शुभांगी तावरे यांनी जाहीररित्या बोलून दाखवली. सोशल मीडियाच्या आभासी जगात खरी बातमी देणे हे एक मोठे आहवान आहे असे पत्रकार श्रद्धा जोगळेकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. माध्यम विश्वाची चौथी लाट जागतिक पातळीपासून दिल्ली गल्लीपर्यंत सोशल मीडिया – ए आय .च्या माध्यमातून येऊन ठेवली आहे , त्यामुळे प्रचंड प्रमाणात मंत्र आणि संक्रमण होणार आहे असे मत राजेंद्र मकोटे यांनी व्यक्त केले .त्याचबरोबर अश्विनी टेंबे, प्रकाश पाटील यांनी आपल्या पत्रकारितेतील अनुभव विशद केले. सूत्रसंचालन अनिता काळे यांनी केले .आगामी काळात जायन्टस ग्रुपतर्फे वेगवेगळे सामाजिक आणि नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतील असे जायटस् पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.