कोल्हापूर ( प्रतिनिधी ) – शाहूपुरीतील प्रतिष्ठित व्यापारी संदीप विश्वनाथ नष्टे यांना त्यांच्या यांच्या घरी एका अज्ञात युवकाने पोलीस असल्याचे सांगत बंदूक दाखव त धमकावल्याने मोठी खळबळ माजली आहे . याप्रकरणी शाहूपूरी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेनऊ ते सव्वा दहाच्या सुमारास अंदाजे 40 सरासरी वय असलेला युवक घरामध्ये आला त्याने तोंडाला मास्क लावला होता आपण पोलीस असून आपला विरुद्ध पोलिसात तक्रार आहे तुम्ही हे प्रकरण वाढवणार की मिटवणार असे विचारत त्यांनी दमदाटी करण्यास सुरुवात केली मात्र हा भामटा असावा असा संशय बळवल्याने नष्टे परिवाराने त्यास बाहेर जाण्यास सांगितले.

त्यावेळी त्यांनी त्या संबंधित पोलीस सांगणाऱ्या हिशोबाने बंदूक काढून संदीप नष्टे यांच्या दिशेने रोखून धरले मात्र त्यावेळी परिवार सदस्य आक्रमक होऊन आवाज वाढल्याचे लक्षात येताच त्यांने त्या ठिकाणाहून पळ काढला या प्रकरणी पोलीस स्थानिक परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करत पुढील शोध घेत आहे या प्रकरणाचे दिवसभर सर्वत्र चर्चा लागून राहिली होती .