कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात २०५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर तब्बल २५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५४८ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच १०५४ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८.३० वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ४६, आजरा तालुक्यातील ३, भूदरगड तालुक्यातील १७, चंदगड तालुक्यातील १५, गडहिंग्लज तालुक्यातील ४, हातकणंगले तालुक्यातील २८, करवीर तालुक्यातील २७, पन्हाळा तालुक्यातील ३, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील १६, शिरोळ तालुक्यातील १२, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २९ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण २०५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ५४८ जण कोरोनामुक्त झालेतं. दरम्यान तब्बल २५  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजअखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४३,९८२.    

एकूण डिस्चार्ज ३३,२९७.  

सध्या उपचारासाठी दाखल रुग्ण ९२६२. 

आजअखेर कोरोनामुळे १४२३ मृत्यू झाले आहेत.