आजच्या काळात मधुमेहाची समस्या खूप सामान्य झाली आहे. हे केवळ वाढत्या वयाच्या लोकांमध्येच होत नाही, तर तरुण लोकही त्याला बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत मधुमेहाबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. मधुमेहाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी आधी त्याबद्दल जाणून घेणे खूप गरजेचे आहे. रक्तातील साखरेची पातळी खूप वाढल्यास, हृदयाशी संबंधित समस्या, ब्रेन स्ट्रोक, किडनी समस्या इत्यादींचा धोका असतो. शरीरात दिसणाऱ्या लक्षणांवरून तुम्ही मधुमेह ओळखू शकता. कालांतराने त्याच्या लक्षणांमध्येही बदल दिसून येतात. मधुमेहाची अनेक लक्षणे सकाळी उठून दिसतात. मधुमेह झाल्यास सकाळी कोणती लक्षणे दिसतात?

सकाळी उठल्यावर थकवा जाणवणे

डायबिटीजचे एक प्रमुख लक्षण म्हणजे अनावश्यक थकवा. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी असंतुलित असल्याने शरीराला ऊर्जा मिळत नाही. रात्री पुरेशी झोप घेऊनही, सकाळी उठल्यानंतर तुमचे शरीर अजूनही थकलेले वाटत असेल, तर हे लक्षण असू शकतं की तुमच्या शरीरात साखरेची पातळी योग्य प्रमाणात नियंत्रित होत नाही. शरीरातील पेशींना पुरेशी ऊर्जा मिळत नसल्यामुळे तुमचा थकवा सतत वाढत जातो.

तोंड कोरडे पडणे आणि तहान वाढणे

डायबिटीजमुळे शरीराला आवश्यक प्रमाणात हायड्रेशन मिळत नाही. शरीरातील जास्त साखरेमुळे किडनी जास्त प्रमाणात मूत्र तयार करते, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. सकाळी उठल्यानंतर तोंड कोरडे पडतं किंवा तुम्हाला जास्त तहान लागत असेल, तर ही स्थिती डायबिटीजची लक्षणं दर्शवू शकते. सतत पाणी प्यायलं तरीही तहान भागत नाही, असं होत असेल तर हे गंभीर लक्षण आहे.

पाय किंवा हात सुजणे आणि वेदना होणे

डायबिटीज असलेल्या लोकांमध्ये रक्ताभिसरणाची समस्या होऊ शकते, ज्यामुळे पाय, हात किंवा इतर भागांमध्ये सूज येते. रात्रीच्या झोपेनंतर पाय किंवा हात सुजलेले किंवा दुखत असल्याचे तुम्हाला वाटत असेल, तर याचा संबंध डायबिटीजशी असू शकतो. रक्तातील साखर वाढल्यामुळे रक्तप्रवाह अडथळित होतो आणि यामुळे हात, पाय सुजून जातात. विशेषत: सकाळी ही समस्या अधिक तीव्र असते.

अंधुक दृष्टी

अंथरुणावरून उठताच तुम्हाला दिसण्यात त्रास होत असल्यास, तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. अशी चिन्हे शरीरातील रक्तातील साखर वाढल्यामुळे असू शकतात. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मधुमेहामुळे डोळ्याची लेन्स मोठी होऊ लागते, त्यामुळे त्यांना दिसण्यात अडचण येऊ शकते.