मुरगूड ( प्रतिनिधी ) : लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळणाऱ्या मेंढपाळ चा मुलगा बिरदेव सिध्दाप्पा डोणे यांचे यमगे ता कागल येथे रविवारी सकाळी जंगी स्वागत होणार आहे.स्वागत साठी अख्खा गाव उपस्थित राहणार आहेच यासाठी गावात पाळक पाळन्यात येणार आहे.जेसीबी च्या सहाय्याने बिरदेव वर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.मुरगूड येथील शिवतीर्थावरून मिरवणुकीस सुरवात होणार आहे.रविवारी सकाळी आठ वाजता मिरवणूक सुरू होणार आहे.
*स्वागताच्या तयारीसाठी यमगे येथील अंबाबाई मंदिर येथे ग्रामस्थांची बैठक पार पडली.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.गावातील चौका चौकात बिरदेवच्या अभिनंदनाचे फलक लावले जात आहेत.रविवारी सकाळी बिरदेव थेट मुरगूड येथील शिवतीर्थावर येणार आहे.तिथे छत्रपती शिवाजी महाराज याच्या पुतळल्याला अभिवादन करून मिरवणुकीला सुरवात होणार आहे.तेथून ही मिरवणूक बाजार पेठ मार्गे मुख्य नाका,शिंदेवाडी यमगेत पोहचणार आहे यावेळी मोटार सायकल रॅली निघणार आहे.
*यमगे च्या प्रवेश द्वारात जेसीबी मधून पुष्पवृष्टी होणार आहे.मुख्य रस्त्यावरून सवाद्य मिरवणूक निघणार असून ग्रामदैवत अंबाबाई चे दर्शन घेऊन बिरदेवच्या घरासमोर या मिरवणुकीची सांगता होणार आहे.याठिकाणी बिरदेवचा सर्व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार होणार आहे.यावेळी बिरदेव आपले मनोगत व्यक्त करणार आहे.स्वागतासाठी कागल तालुक्यातून मोठ्या प्रमाणात युवक उपस्थित राहणार असून राज्याच्या विविध जिल्ह्यातून ही समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे.







