मुंबई – सध्या राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरु झालीय. सर्व राजकीय नेते जोरदार प्रचार करत आहे. विधानसभा निवडणूक या 20 नोव्हेंबरला होणार असून लगेच 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे जसजसे निवडणूका जवळ येत आहे तसतसे नेते आक्रमक भूमिका मांडत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी विधानसभेच्या अनुषंगाने आपलीम मत मांडले आहे.

काय म्हणाले शरद पवार..?

“यावेळची निवडणूक महत्वाची आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केलीय. दुसऱ्या बाजूला भाजपा, राष्ट्रवादी, आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवित आहेत” असं शरद पवार म्हणाले. “पुणे जिल्हा खूप मोठा आहे. सत्ता पक्षाने दिली त्या सत्तेसाठी लोकांनी साथ दिली. मात्र ज्यांना निवडून दिलं, ते लोकांना विसरले” असं म्हणत नाव न घेता शरद पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या 54 आमदारांपैकी 44 आमदार दुसरीकडे पळवून नेले. त्यात आंबेगावमधील आमदार देखील होते” असं शरद पवार म्हणाले. “मी दिल्लीत काम करण्याचे ठरविले आणि राज्यात नेतृत्व करण्याची संधी दिली. मात्र असं कधी घडेल, मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु ते घडलं” असं राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवर शरद पवार यांनी वक्तव्य केलं. त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर टीका केली.