कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने प्रकाश आबिटकर यांनी राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातील घोटवडे, कौलव, बरगेवाडी, सिरसे, आमजाई व्हरवडे, आवळी बुद्रुक, आणाजे, कसबा तारळे, कुंभारवाडी, तारळे खुर्द, कंथेवाडी, कांबळवाडी आदी गावांचा दौरा केला. यावेळी उपस्थित नागरीक, कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधला.

यावेळी प्रकाश आबिटकर म्हणाले, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्यात आर्थिक सक्षमता आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने कौलवच्या डोंगरावर एम. आय. डी. सी. करण्याचा प्रयत्न केला. लोकांचा विरोध घेऊन मला एमआयडीसी प्रकल्प करायचा नाही. प्राधिकरणाच्या माध्यमातून पर्यटन विकास करून या परिसराचे नंदनवन करुया. स्व. दादासाहेब पाटील यांनी साखर कारखाना काढल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आली. पर्यटन प्राधिकरणाच्या माध्यमातून या भागाचा विकास होणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.