माझा 11 दिवसांचा सोहळा तुम्ही आनंदाने साजरा करता…
अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आतुरतेने वाट पाहता….
कोल्हापूर : (अमृता बुगले) : झाली का मग तयारी माझ्या आगमनाची की अजून बाकी आहे..? आता लगबग सुरू असेल ना माझ्यासाठी मखर बनवण्याची . छोट्या छोट्या मखरामध्ये बसण्याची मज्जाच काही और आहे. प्रत्येक घराघरात माझे वास्तव्य हे असतेच . माझ्या लहानमोठ्या आकाराच्या प्रतीकृतीही तुम्ही बनवल्या असतील व त्यांना सुरेख रंगकाम ही सुरू असेल तुमचं. माझ्या स्वागताला सज्ज झाला आहात ना तुम्ही..? . माझे आगमन झाल्यावर माझे आवडते मोदक करायला विसरू नका बरं… मग ह्या वर्षी कोणकोणते नवनवीन कार्यक्रम तुम्ही आयोजित करणार आहात मग माझ्या सोहळ्यानिमित्त.. मी येतोय .. आता काहीच दिवस उरले आहेत माझ्या आगमनासाठी . मलाही तुम्हांला सगळ्यांना भेटण्याची आस लागून राहिली आहे . कधी एकदाचा येतोय असं झालं आहे .
माझं आगमन झालं की , तुम्ही सगळे दररोज माझी पूजा – अर्चना करता ,मनोभावे सेवा करता . दररोज नवनवीन पदार्थांचा नैवेद्य करून मला अर्पण करता . माझ्या या 11 दिवसांच्या सोहळ्यात विविध स्पर्धा तुम्ही आयोजित करता . त्यामुळे काही काळ का असेना माझ्या लहानमोठया बहिणींना मनमुरादपणे आनंद लुटता येतो .त्यांना आनंदी पाहून मलाही समाधान लाभते . तुमच्याबरोरचे हे 11 दिवस कसे जातात , हे माझचं मलाच समजत नाही . जेव्हा निरोप घेण्याची वेळ येते तेव्हा मला खूप वाईट वाटते . तुम्हांला सोडून जाताना मला दु :खंही होतं ,मात्र ,पुढल्या वर्षी लवकर या असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा थोडसं बरं वाटतं . तुम्ही लोक माझं विसर्जन करता पण , माझं नीट विसर्जन केलं नसल्याने माझी माझ्या प्रतीकृतीचे तुकडे सर्वत्र विखुरलेले असतात . कुठेतरी पडलेले असतात तुम्ही ते विखुरलेले तुकडे सुद्धा नीट एकत्र करून विसर्जीत करत नाहीत ,
हे सगळं पाहिलं की , मला असह्य वेदना होतात. माझ्या तुमच्याकडून फार काही अपेक्षा नाहीत, फक्त एकच अपेक्षा आहे ती म्हणजे, तुम्हांला जर माझ्या भव्य प्रतिकृतीच नीट विसर्जन करता येत नसेल तर माझी लहान प्रतिकृती आणून बसवलीत तरी चालेल आणि ती प्रतिकृती ही पर्यावरण पूरक असेल अधिकच उत्तम ठरेल …