कोल्हापूर ( प्रतिनिधी ) : राष्ट्रवादीतील फुटीनंतर आपली भूमिका स्पष्ट न केलेले तसेच , लोकसभेच्या प्रचारात महायुतीचे उमेदवार माजी खा. संजय मंडलिक यांच्या प्रचारात सक्रिय राहिलेल्या माजी आ. के. पी. पाटील यांनी मी अजित पवार यांच्यासोबत गेलोच नसतो अशी माहिती माध्यमांशी बोलताना दिली आहे. त्याचबरोबर जिल्हयाच्या राजकारणात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची साथ सोडत असता मी मूळ राष्ट्रवादीत असल्याच सांगितलं आहे.
के.पींच्या ‘या’ वक्तव्याने सर्वंच झाले थक्क
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर जिल्हाध्यक्ष ए.वाय. पाटलांनी आपला पाठिंबा अजित पवारांना असल्याचं सांगितलं . मात्र , के. पी. पाटलांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. हसन मुश्रीफ व अजित पवार नेत्यांसोबत के. पीं ची उठबस सुरू होती. मात्र , त्या पक्षाच्या बैठका व मेळाव्यापासून ते दूरच राहिले होते. लोकसभा निवडणूकीत के. पी. पाटील हे महायुतीत होते. मात्र, त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार ते राष्ट्रवादीतच असल्याची माहिती समजल्याने सर्वंजण थक्क झाले आहेत.
आज शरद पवार यांची के. पी. पाटील यांनी भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादीचा आहे व राष्ट्रवादीचाच राहणार , मी कोणत्याही पदाचा राजीनामा दिलेला नाही. मी अजित पवार यांच्यासोबत गेलेलोच नसल्याने मी कोणत्याही पदाचा राजीनामा देणार नाही. मी महाविकास आघाडीसोबतच काम करणार असल्याचंही के. पी. पाटील यांनी यावेळेस सांगितलं आहे.