कोल्हापूर (प्रतिनिधी) : मालमत्तेच्या वादातून पत्नीने पतीला बेदम मारहाण करुन जखमी केल्याची घटना घडली. जितेंद्र जयसिंगराव भोसले (वय ४४, रा. कपिलपार्क, सानेगुरुजी वसाहत) असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र भोसले हे आपल्या पत्नी वृषाली आणि दोन मुलांसोबत राहतात. गेली काही दिवस दाम्पंत्यामध्ये मालमत्तेवरून वाद सुरू होता. पत्नी वृषाली हिने पतीला मालमत्ता माझ्या नावावर का करत नाहीस, म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये जितेंद्र भोसले जखमी झाले. या घटनेनंतर राजवाडा पोलीस ठाण्यात पत्नी वृषाली भोसलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.