कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात सह्याद्री प्रतिष्ठानच्या ‘सह्याद्रीचा रणसंग्राम’ या गीत ध्वनिमुद्रणाचा शुभारंभ आज (मंगळवार) खा. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (‘स्वराज्यरक्षक संभाजी महाराज मालिका’ फेम महाराणी येसूबाई) व आमदार संजय ठाणेकर (ठाणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी खा. संभाजीराजे, प्राजक्ता गायकवाड यांच्यासह मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.

‘सह्याद्रीचा रणसंग्राम’चे गीतलेखन युवराज पाटील यांनी केले असून शशांक पोवार यांनी संगीत दिले आहे. या वेळी प्रतिष्ठानचे श्रमिक गोजमगुंडे, शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक प्रभावळकर, गणेश लोणारे, चंद्रशेखर धन्वंतरी यांच्यासह सह्याद्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.