मुंबई – बॉलिवूड चॉकलेट बॉय अभिनेता रणबीर कपूर ओळखले जाते. रणबीर कपूर बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमा दिला आहे. अभिनेता रणबीर कपूर सतत कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतो. नुकताच त्याचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटाला सुरवातीला टीकेचा सामना करावा लागला होता. मात्र या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगपासून जोरदार कमाई करण्यास सुरवात केली होती. हा चित्रपट बिग बजेट आहे, VFX, तगडी स्टारास्ट यामुळे चित्रपटाचे बजेट जास्त होते. दिग्दर्शक अयान मुखर्जी या चित्रपटावर तब्बल १० वर्ष काम करत होता. त्याने एका मुलाखतीत सांगितले अभिनेता रणबीर कपूर याने पहिल्या मानधनाविषयी सांगितले आहे.
रणबीरची पहिली सॅलरी किती ?
‘प्रेम ग्रंथ’ हा चित्रपट 1996 साली प्रदर्शित झाला होता. दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यादरम्यान 14 वर्षांच्या रणबीरने या चित्रपटासाठी असिस्ट केले होते. एका मुलाखतीदरम्यान रणबीरने पहिल्या पगाराविषयी खुलासा केला. ‘ प्रेमग्रंथ चित्रपटासाठी मी असिस्टंट म्हणून काम केलं, तेव्हा मला 250 रुपये पगार मिळाला. मात्र तेव्हा हातात पैसे आल्यावर मी एखाद्या चांगल्या, आदर्श मुलाप्रमाणे आईकडे ( नीतू कपूर) गेलो आणि ते पैसे तिच्या चरणांशी ठेवले. ते पाहून माझ्या आईच्या डोळ्यात अश्रू होते. तो माझ्यासाठी एखाद्या चित्रपटातील सीनप्रमाणे क्षण होता ‘ अशी आठवण रणबीरने सांगितली.
एका चित्रपटासाठी रणबीर किती फी आकारतो ?
त्यावेळी मिळालेले पैसे आणि ते आत्ताची कमाई… रणबीरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. एकेकाळी ज्याला 250 रुपये मिळाले होते, तोच रणबीर आता एका चित्रपटासाठी 70 ते 75 कोटी रुपये आकारतो. रिपोर्ट्सनुसार, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटासाठी रणबीर कपूरने 70 कोटी फी घेतली होती. तर आणखी एका रिपोर्टनुसार, ‘रामायण’या आगामी चित्रपटातो श्रीरामाची भूमिका साकारणार असून त्यासाठी त्याने 75 कोटी रुपये चार्ज केल्याची चर्चा आहे. नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाची ट्रायालॉजी असून त्याद्वारे रणबीर तगडी कमाई करणार आहे.