बदाम हे असे ड्रायफ्रुटस जे एकंदरीत सर्वांना खायला आवडते. परंतु आरोग्यासाठी बदाम हे सर्वोत्तम ड्रायफ्रुटस मानले जाते. आपल्याला लहानपणापासूनच नेहमी आजी आजोबा बदाम खाण्याचा सल्ला देतात . असे म्हटले जाते की बदाम खाल्ल्याने बुद्धी तल्लख होते. पण या व्यतिरिक्तही बदामाचे असे बरेच फायदे आहेत. बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. पण तुम्हाला माहिती आहे का एका व्यक्तीने दिवसभरात नक्की किती बदाम खाल्ले पाहिजेत चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.

एका दिवसात किती बदाम खाल्ले पाहिजेत?

एका दिवसभरात तुम्हाला मुठभर बदाम खाल्ले पाहिजेत. यामुळं एनर्जी बुस्ट होण्यास मदत मिळते. मुठभर बदाम म्हणजे 7-8 बदाम तुम्ही खावू शकता. तुम्ही बदाम दुधात किंवा पाण्यात भिजवून खावू शकता. हेदेखील खूप फायदेशीर आहे. तुम्हाला असं बदाम खायला आवडत नसतील तर तुम्ही कच्च बदाम किंवा रोस्टेड बदामदेखील खावू शकतात.

केव्हा खाल्ले पाहिजेत बदाम?

सकाळी बदाम खाण्याची योग्य वेळ आहे. रिकाम्या पोटी खाल्ले तर आणखीनच उत्तम. अशावेळी दिवसभराची एनर्जी मिळते. बदाम उर्जा मिळवण्याचा चांगली स्त्रोत आहे. त्यामुळं वर्कआउटच्या आधी तुम्ही बदाम खावू शकता. वर्कआउटनंतर प्रोटीन म्हणजेच ग्रीक योगर्टसोबतही तुम्ही बदाम खावू शकता. यामुळं मांसपेशिया मजबूत होतात. रात्रीच्या वेळी बदाम खाल्ले तर चांगली झोप येते. यातील मॅग्नीशियममुळं मेंदू तणावमुक्त होतो.

बदाम खाण्याचे फायदे

रात्री 3 ते 4 बदाम भिजवा. सकाळी ही बदाम सोलून तुम्ही खाऊ शकता. हे बदाम आपल्याला त्वरित ऊर्जा देतील

जेव्हा तुम्हाला 10 दिवस 2 बदाम खाण्यास सोयीस्कर वाटत असेल आणि पचनाची कोणतीही समस्या नसेल, तेव्हा तुम्ही 5 बदाम खाणे सुरू करू शकता.

एका दिवसात 6 ते 8 बदामांपेक्षा जास्त बदाम सेवन करू नयेत, यामुळे वजन वाढू शकते आणि शरीराची उष्णता देखील वाढू शकते.

रोज बदाम खाल्ल्याने हृदय, मेंदू, त्वचा आणि केसांच्या आरोग्याबाबत समस्या उद्भवत नाहीत.

बदाम कच्चेही खाऊ शकतात पण सर्वात चांगला उपाय म्हणजे भिजवलेले बदाम खाणे. बदाम रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी खाल्ले जातात

बदाम खाल्ल्याने महिलांच्या पीरियड्स क्रॅम्पच्या समस्येपासून आराम मिळतो. बदाम खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. पोटाचा त्रास होत नाही.